पनवेल : वार्ताहर
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्यातुन बंद पडलेले व्यवसाय व नोकरी यामुळे सामान्य गरीब लोकांची अत्यंत हालाकिची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांच्या संकल्पनेतुन तसेच पोलीस सहआयुक्त डॉ. जय जाधव, पनवेल परिमंडळ 2 पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देवीदास सोनवणे यांनी व त्यांच्या सहकार्यांनी परिसरातील अनेक संस्था व लोकांना तसेच आश्रम यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यामध्ये प्रामुख्याने खांदा कॉलनी सेक्टर 12 येथील अनाथ व लहान मुलांच्या बालग्राम आश्रमात, सेक्टर 7 येथील अनाथ मुलींच्या मंगलाश्रय सामाजिक संस्थेच्या आश्रमाला, तसेच नवीन पनवेल सेक्टर 5 येथील गुरूद्वरा येथे पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील यांच्या हस्ते एकूण 1200 किलो तांदुळ, 600 किलो गहु, 600 किलो डाळ, 45 किलो तेल, 10 किलो पीठ व इतर जीवनावश्यक व शाळेच्या वस्तु मदत स्वरूपात देण्यात आल्या.