Breaking News

कोरोना संकटातही डाक कर्मचार्यांची अखंड सेवा

पनवेल : वार्ताहर

कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. असे असतानाही नवीन पनवेल, पनवेल येथील पोस्ट कार्यालयातील डाक कर्मचारी मात्र जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या दारात जाऊन आलेले पत्रव्यवहार व इतर टपाल पोहचते करताना दिसून येत आहेत.

23 मार्च 2020 पासून कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. आजमितीस दीड वर्ष लोटले आहे. तेव्हापासून पनवेल महापालिका व रायगड जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत पनवेल तसेच नवीन पनवेल येथील मुख्य पोस्ट कार्यालयातील डाक कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत एकही पत्र किंवा इतर टपाल गहाळ न करता नागरिकांच्या दारात जात आहेत. कोरोना महामारी आज आहे उद्या नाही, असे म्हणत कर्तव्य पार पाडावेच लागेल, असेही कर्मचारी सांगत आहेत. येथील पोस्ट कर्मचारी पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, तसेच पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात पोस्टमन, पोस्टल असिस्टंट, पोस्ट मास्टर, जीवाची पर्वा न करता केंद्र सरकार आणि जिल्हा प्रशासन व पनवेल महापालिकाकेने दिलेल्या सुचनांचे पालन करीत आहेत.

कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे कर्मचायांच्या संरक्षणार्थ मुख्य डाक कार्यालयाच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप नित्याने केले जाते. एवढेच काय त्यांना वेळोवेळी सामाजिक अंतर ठेवण्याच सूचनाही दिल्या जातात. पत्र वा इतर टपाल नागरिकांना घरपोच करायचे झाल्यास सामाजिक अंतर ठेवून, मास्क लावूनच हा पत्र व्यवहार करावा, असेही सांगितले जात असल्याचे पनवेल ग्रामीण भागातील डाक कर्मचार्‍याने बोलताना दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply