पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे आजच्या कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. 2) सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून नागरिकांसाठी आरोग्यदायी उपक्रमे पार पडली. वाढदिवसाचे औचित्य साधून युवा नेते केदार भगत यांनी पनवेलमधील पत्रकारांना मास्क व आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप केले. पत्रकारांसह त्यांनी पोलीस व समाजातील नागरिकांना देखील मास्क व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप केले.