पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त शनिवारी (दि. 1) ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत व्ही. के. हायस्कूल आणि चिंतामणी हॉल येथे कोरोना नियमांचे पालन करत रक्तदान शिबिर झाले. या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पनवेलमधील व्ही. के. हायस्कूलमध्ये शिवसंकल्प प्रतिष्ठाण आणि चिंणामणी हॉलमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, स्वर्गीय अनिकेत ओव्हळ स्मृती समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पनवेल सह्याद्री प्रतिष्ठाण, राजे शिवराय प्रतिष्ठाण स्कीमर्स फॅमिली गु्रप यांच्या वतीने आणि टाटा मेमोरीयल सेंटर व एमजीएम हॉस्पिटल यांच्या माध्यामातून रक्तदान शिबिराचे आतोजन करण्यात आले होते.
1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना कोविड लसीकरण सुरू झाले आहे. लस घेतल्यानंतर 60 दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे या रक्तदान शिबिरांचे महाराष्ट्र दिनाचे औचित्यसाधून आयोजन करण्यात आले होते. या वेळी नगरसेविका रूचिता लोंढे, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहीत जगताप, प्रेरणा पवार, धनराज विसपुते, वैष्णव देशमुख, अमोल साखरे, उन्मेष लोहार, दीपक जोगले, सतीश महाजन, दर्शन म्हात्रे, संजय पाटील, अनिकेत पवार, सुजीत भगत यांच्यासह शिवसंकल्प प्रतिष्ठाणचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.