नवीन पनवेल ः प्रतिनिधी
पोयंजेवाडी येथे नवीन घरकुलाचा गृहप्रवेश आणि शुभारंभ पनवेल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते आणि सरपंच जगदिश नामदेव मते यांच्या हस्ते करण्यात आला.
ग्रुप ग्रामपंचायत पोयंजेमध्ये पोयंजेवाडी येथे महाआवास योजनेंतर्गत अदिम आवास घरकुल योजनेमधून नीलम पांडुरंग कातकरी व सुश्मिता संतोष वाघमारे यांचा घरकुल गृहप्रवेश व नवीन घरकुल शुभारंभ गटविकास अधिकारी लता मोहिते आणि सरपंच जगदिश मते यांनी केला. या वेळी विस्तार अधिकारी यू. डी. पाटील, ग्रामसेवक धनंजय निकम, जयेंद्र म्हात्रे, रोहिदास चोरघे, अनिता पवार, चंदने आदी उपस्थित होते.