Breaking News

…म्हणून आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

कोरोनाचा फटका सल्यानंतर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून घेण्यात आला आहे. बीसीसीआयने यासंंधी अधिकृत घोषणा केली असून, आयपीएलनेही ट्विट करीत निवेदन प्रसिद्ध करून स्पर्धा स्थगित करण्याचे कारण सांगितले आहे. आयपीएल आणि बीसीसीआयने तातडीने बैठक घेत आयपीएलचा सध्याचा हंगाम तत्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसेच इतरांच्या सुरक्षेशी बीसीसीआय तडजोड करू इच्छित नाही. भागधारकांची सुरक्षा, आरोग्य लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला, असे आयपीएलकडून सांगण्यात आले आहे. स्पर्धा पूर्णपणे रद्द करण्यात आलेली नसून, कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे. काही दिवसांनंतर सर्व संबंधितांशी चर्चा करून उर्वरित स्पर्धा घेता येईल का, कुठे व कशी घेता येईल आदीची चाचपणी केली जाईल असं बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. आयपीएल 2021मध्ये सहभागी झालेल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी तसेच सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी बीसीसीआय आपल्या सर्व अधिकारात प्रयत्न करेल. या अत्यंत कठीण परिस्थितीतही आयपीएल 2021 आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार्‍या सर्व आरोग्य कर्मचारी, राज्य संघटना, खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, फ्रँचायजी, प्रायोजक, भागीदार आणि सेवा पुरवणार्‍यांचे बीसीसीआय आभार मानू इच्छित आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply