Breaking News

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा भाजपकडून निषेध

अलिबाग : प्रतिनिधी

पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा बुधवारी (दि. 5) अलिबागमध्ये भाजपतर्फे निषेध करण्यात आला. या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

विधासभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगाल राज्यामध्ये  हिंसाचार सुरु झाला आहे. या हिंसाचारात भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. त्यात अनेकांचे प्राण गेले आहेत. त्याचा आम्ही निषेध करत आहोत, असे या निवेदनात म्हटले आहे. अलिबाग पंचायत समिती सदस्य उदय काठे, तसेच अ‍ॅड. अंकित बंगेरा, विकास काठे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

कर्जत : प्रतिनिधी

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे गुंड ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ले करीत आहेत. त्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 5) कर्जतमध्ये  निदर्शने केली.

विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यापासून पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. या हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने बुधवारी सकाळी कर्जतमधील लोकमान्य टिळक चौकात निदर्शने केली.

हातात फलक घेवून आणि कोरोनाविषयक नियम पाळून करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात  भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजप किसान मोर्चाचे कोकण विभाग संयोजक सुनील गोगटे, मंदार मेहेंदळे, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, महिला मोर्चा जिल्हा चिटणीस बिनीता घुमरे, शहर अध्यक्षा स्नेहा गोगटे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, विशाखा जिंनगरे तसेच शर्वरी कांबळे, सुषमा ढाकणे, शारदा भंगाळे, अभिनय खांगटे, केशव तरे, मारुती जगताप, मनिषा अथनिकर, सरस्वती चौधरी, संदीप म्हसकर, सर्वेश गोगटे, समीर घरलुटे, प्रशांत प्रभुणे, चांदभाई मणियार, बिलाल आढळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा नेरळमध्येही निषेध करण्यात आला. त्या वेळी भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, नरेंद्र कराळे, नरेश जोशी, रोशन राणे, प्रकाश पेमारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पाली : रामप्रहर वृत्त

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ सुधागड तालुका भाजपाच्यावतीने बुधवारी दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांच्या उपस्थित तहसीलदार दिलिप रायण्णावार यांना निवेदन देण्यात आले.

विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे गुंड भाजप पदाधिकारी व  कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले करीत आहेत. त्याचा निषेध म्हणून सुधागड तालुका भाजपाच्यावतीने बुधवारी सकाळी पालीत तृणमूल काँग्रस व ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच राजेश मपारा यांच्या उपस्थित तहसीलदार दिलिप रायण्णावार यांना निवेदन देण्यात आले.

भाजपचे सुधागड तालुकाध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, प्रसाद लखिमळे, सागर मोरे, रोहन दगडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply