अलिबाग : वैवाहिक वादाची तसेच कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे जलदगतीने व सामोपचाराने निकाली निघावीत या हेतूने अलिबाग येथे सुरु करण्यात आलेल्या कौटुंबिक न्यायालयाचे मंगळवारी (दि. 5) उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. रायगडच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे, पालकमंत्री अदिती तटकरे, अलिबाग बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. प्रवीण ठाकूर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश अभय जोगळेकर यांच्यासह अन्य वकील व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.घटस्फोट, विवाहाचे शून्यीकरण अर्थात रद्द करणे, कायदेशीर विभक्तपणा, नांदायला जाणे, वैवाहिक संबंधातून निर्माण झालेल्या संपत्तीबाबतचे प्रतिबंधात्मक दावे, पत्नी, मुले यांच्या पोटगी, पालन पोषणाबाबतचे दिवाणी दावे, पोटगी वसुली दावे, वाढीव पोटगी किंवा इतर किरकोळ वैवाहिक वादासंबंधीची प्रकरणे या न्यायालयात चालवली जाऊ शकतात. यामुळे अन्य सत्र न्यायालयांवरील ताण कमी होणार आहे. तसेच कौटुंबिक वाद जलदगतीने सोडविण्यास मदत होणार आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …