Breaking News

नवीन पनवेलमधील झोपडपट्टीवासीयांना अन्नदान

पनवेल : वार्ताहर

नवीन पनवेल येथील पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेमार्फत 26 एप्रिलपासून सोमवार व शुक्रवार अन्नदान वाटप करण्यात येते. त्याचे सातत्य ठेवत पंचशील नगर, आदई तलाव झोपड्या, सेक्टर 6 समोरील झोपड्यांमध्ये सुमारे 300 लोकांना मोफत अन्नदान करण्यात आले.

या अन्नदानाच्या कार्याला सनी कैकाडी हे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी या कार्यात सहभागत घेत या उपक्रमाचे कौतुक केले असून हे काम पुढे असेच चालू राहण्यासाठी आपण मदत करू, असे आश्वासन दिले. या अन्नदानाच्या कार्यासाठी मनोज ठाकूर एकविरा चिकन सेंटर यांनी अन्नधान्याचा खर्च देऊन अन्नदानाच्या  या कार्यात मदत केली.

या सामाजिक कार्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, खजिनदार भानुदास वाघमारे, सचिव राहुल पोपलवार, सहसचिव विनोद खंडागळे, संघटक कैलास नेमाडे, कमिटी सदस्य अमेय इंगोले, रामदास खरात, हेमा रोड्रिंक्स, संतोष जाधव, वल्ली महमद शेख, संतोष ढोबळे, संजय धोत्रे, हरीचंद बनकर, शोभा गवई, विनोद तायडे, आदींसह विशेष मेहनत घेणारे रहिवाशी सुशांत पाटील, दीपक खरात, विनोद इंगोले, अंकुश पाखरे, कडबा गाडगे, सागर चव्हाण, अनिल खिलारे, अमोल गाडगे, जितू घाटविसावे, संजय कंठाळे, संजय तायडे, जूम्मंनभाई, संजीव ठाकूर, मनोज ठाकूर, आमन तायडे, अविनाश पराड, करन बोराडे, गोपाल उबाळे, उमेश पलमाटे, अनिल वानखेडे, धीरज नाईक, रोहित पवार, संतोष पाल, अमोल डाके, रोहित चव्हाण आदींबरोबर महिला भगिनी पल्लवी आखाडे, रुपाली खंडागळे, अक्षदा कदम, सरस्वती वाकुडे, विजय मला कुशबा, शांतावा मस्के, पवित्र खंडागळे, आरती कुशबा, निकीती वाकुडे, आदी मेहनत घेऊन या पुढेही मेहनत घेणार आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply