Breaking News

इंग्लंडला धक्का, अ‍ॅशेस मालिकेतून अँडरसन ‘आऊट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अ‍ॅशेस मालिकेत 1-1 बरोबरी साधल्यानंतरही इंग्लंडच्या संघासमोरची विघ्न कमी होताना दिसत नाहीयेत. इंग्लंडचा आघाडीचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतीमुळे अ‍ॅशेस मालिकेतून बाहेर पडला आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता, याच सामन्यात अँडरसनला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तो सामना मध्यावर सोडून ड्रेसिंग रुममध्ये परतला होता. वैद्यकीय तपासणीत अँडरसनच्या पोटरीला दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले. यावर उपचार करण्यासाठी अँडरसन इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या प्रशिक्षक डॉक्टरांच्या पथकाकडून उपचार घेत होता, मात्र तिसर्‍या कसोटीनंतरही अँडरसनच्या दुखापतीमध्ये सुधारणा होत नसल्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अँडरसन अ‍ॅशेस मालिकेत खेळू शकणार नसल्याचे जाहीर केले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply