Breaking News

चेन्नईचा कोलकातावर 5 गडी राखून विजय

कोलकाता : वृत्तसंस्था

इम्रान ताहीरच्या फिरकी गोलंदाजीनंतर सुरेश रैनाने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने रविवारी ईडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला. कोलकाताचे 162 धावांचे लक्ष्य चेन्नईने 5 गडी राखून सहज पार केले. ताहीरने 27 धावांत 4 बळी घेतले, तर रैनाने अर्धशतकी खेळी केली. कोलकाताचा हा सलग तिसरा पराभव ठरला. या विजयामुळे चेन्नईचे 14 गुण झाले असून ते प्ले ऑफच्या उंबरठ्यावर आले आहेत.

ख्रिस लीनच्या (82) धावांच्या खेळीवर चेन्नईच्या इम्रान ताहीरने पाणी फिरवले. ताहीरने कोलकाताच्या चार प्रमुख खेळाडूंना बाद करत सामन्याचे चित्रच पालटले. त्यामुळे कोलकाताला 20 षटकांत 8 बाद 161 धावा करता आल्या. ताहीरने 4 षटकांत 27 धावा देत 4 बळी घेतले. शार्दूर ठाकूरने दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना आंद्रे रसेलने टाकलेल्या तिसर्‍या षटकात फॅफ ड्यू प्लेसिसने सलग चार चौकार. चेन्नईने 3 षटकांत 29 धावा केल्या. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हॅरी गर्नेयने चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसनला (6) बाद केले. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनाने सहावी धाव घेताच विक्रमाची नोंद केली. कोलकाता विरुद्ध सर्वाधिक 765 धावा करण्याचा विक्रम त्याने केला. रैनाने सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरचा 762 धावांचा विक्रम मोडला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply