Breaking News

तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली सावळे, करंजाडेत महायुतीचा जोरात प्रचार

पनवेल ः रामप्रहर वृत्त

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ करंजाडे आणि नेवाळी येथे रविवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत उपस्थित होते.

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचार पनवेल मतदारसंघात जोरदारपणे सुरू आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील करंजाडे आणि नेवाळी येथे प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, रमेश पाटील, रघुनाथ पाटील, राजेश काथरा, विश्वजित पाटील, भाजप महिला मोर्चा तालुका उपाध्यक्षा समिना साठी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’

आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …

Leave a Reply