Breaking News

पाण्याची फुटलेली पाइपलाइन त्वरीत बदला

नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल येथील सेक्टर 1एसमध्ये असलेली पाण्याची फुटलेली पाइपलाइन त्वरित बदलण्यात यावी अथवा दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भातील पत्र त्यांनी सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाकडे व एमजीपीच्या (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) नवीन पनवेलमधील कार्यालयात दिले आहे.

वाघमारे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नवीन पनवेल येथील सेक्टर 1एस मध्ये खुप दिवसांपासून एमजीपीची मोठी पाइपलाइन ही फुटलेली आहे. त्यामधून रोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. सध्याच्या परिस्थिती पाहता नवीन पनवेलमध्ये अपूरा पाणीपुरवठा होत आहे आणि एकीकडे हजारो लीटर पाणी वाया जाताना दिसत आहे. त्यामुळे एमजीपीचा हलगर्जीपणा दिसून येत आहे.

सिडको आणि एमजीपी कार्यालय यांना वारंवार फोनवरुन सूचना देऊनही आजतागायत दुरूस्ती झालेली नाही. रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. सुचना देवूनही आपणाकडुन कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. आज नवीन पनवेल वासीयांचे दुर्दैव आहे की, डोळ्यांसमोर एकीकडे हजारो लीटर पाणी वाया जाताना दिसत आहे आणि एकीकडे पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. समस्येचेे गांभीर्य लक्षात घेता आपल्या कार्यालयाकडून लवकरात लवकर नवीन पनवेल येथील सेक्टर 1एस मध्ये फुटलेली पाइपलाइन त्वरित बदलण्यात यावी किंवा त्वरित दुरूस्त यावी.

यासंदर्भात येत्या सोमवारपर्यंत शटडाऊन घेऊन फुटलेल्या पाइपालाइनची दुरुस्ती करण्यता येईल, असे एमजीपी व सिडको कार्यालयाचे म्हणणे आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply