Breaking News

जांभिवली गावातील आदिवासींना अन्नधान्य वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप पनवेल-उरण विभाग उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष व रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश सदाशिव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जांभिवली येथील आदिवासीवाडीत अन्नधान्य वाटप करण्यात आले.

कोरोना महामारीच्या काळात गोरगरीबांना मदत करण्याच्या उद्देशाने व वाढदिवसाचे औचित्य साधून राकेश गायकवाड यांनी त्यांच्या मित्र व परिवारासमवेत जांभिवली येथील आदिवासींना अन्नधान्य वाटप केले. या वाटपाच्या वेळी राकेश गायकवाड, शेखर भोईर, रुपेश गायकवाड, अक्षय गायकवाड, समाधान गायकवाड, सुदर्शन म्हात्रे, किरण घरत, प्रिन्स गायकवाड, अंश गायकवाड, आर्या गायकवाड, हनुमान कोंडीलकर आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply