नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या पुढील हंगामासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) दोन नवीन संघ स्पर्धेत आणणार आहे. ‘क्रिकबझ’च्या अहवालानुसार या नव्या टीमची बेस प्राइस सुमारे 1800 कोटी रुपये असू शकते, परंतु बोली लावल्यामुळे या टीमचे मूल्य 2200 ते 2900 कोटीपर्यंत जाईल.
पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सची किंमत 2700 ते 2800 कोटी रुपये आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज 2200-2300 कोटींची टीम आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सची किंमत 1855 कोटी रुपये आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, आयपीएलच्या दोन नव्या संघांचा लिलाव पुढच्या महिन्यात जुलैमध्ये होऊ शकतो. बीसीसीआय यावर काम करीत आहे. आयपीएल 2022मध्ये खेळणारी एक नवीन टीम अहमदाबादची असू शकते. जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियमही अहमदाबाद येथे बांधले गेले आहे. आयपीएल 2021चे काही सामनेही येथे खेळले गेले. गुजरात लायन्सही आयपीएलचा एक भाग होती. उत्तर प्रदेशचा संघही आयपीएल 2022मध्ये येऊ शकतो. आठपेक्षा अधिक संघ आयपीएलमध्ये भाग घेण्याची ही पहिली वेळ नाही. 2011मध्ये 10 संघांनी स्पर्धेत भाग घेतला होता, तर पुढील दोन हंगामात नऊ फ्रेंचायझींचा सहभाग होता.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …