Breaking News

खोटे दस्ताऐवज तयार करून दुसर्याची जमिन बळकावली

नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कर्जत : बातमीदार

खोटे दस्ताऐवज तयार करून काही इसमांनी नेरळजवळील माणगाव तर्फे वरेडी येथील जमीन स्वतःच्या नावावर केल्याची घटना घडली आहे. याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत राहणारे महंमद अफाक इसाक अन्सारी यांंच्या वडिलांनी माणगाव तर्फे वरेडी (ता. कर्जत) येथील जमीन खरेदी केली होती. मात्र संदीप राजाराम गायकवाड (रा. आसल, ता. कर्जत), सुरेश शिवराम गायकवाड (रा. केळवणे, ता. पनवेल), अजय शंकर कांबळे (रा. बदलापूर) आणि आणखी एक इसम या चौघांनी बनावट दस्ताऐवज तयार करून आणि अन्सारी यांच्या मयत वडिलांच्या जागेवर खोटा इसम उभा करुन सदर जमीन स्वतःच्या नावावर केली. हे अन्सारी यांना समजताच त्यांनी खात्री करून कर्जत दिवाणी न्यायालयात दाद मागितली होती.

या प्रकरणी न्यायालयाने नेरळ पोलिसांना अधिक तपास करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नेरळ पोलिसांनी सदर घटनेची नोंद करत भादंवि कलम 420, 466, 467, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक फौजदार गणेश गिरी अधिक तपास करीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply