Wednesday , February 8 2023
Breaking News

लहान मुलांसाठी लवकरच येणार आणखी एक लस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये भारताला लवकरच आणखी एक लस मिळणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) हैदराबादच्या बायोलॉजिकल ई लिमीटेड या कंपनीला 5 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठीच्या कोरोना लसीसाठी क्लीनीकल ट्रायल घेण्याची परवानगी दिली आहे. अटी आणि शर्थींसह डीसीजीआयने कॉर्बेवॅक्स (उेीलर्शींरु) या लसीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या क्लीनीकल ट्रायलसाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या 10 ठिकाणी या लसीची क्लिनिकल ट्रायल होणार आहे. तज्ञांच्या समितीच्या शिफारशीनंतर या लसीच्या ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बायोलॉजिकल कंपनी तयार करत असलेली ठइऊ प्रोटीन सब यूनिटची ही लस आहे. कॉर्बेवॅक्सचे दोन डोस असणार आहेत. डीसीजीआयने 5 ते 18 वर्षांच्या मुलांवरील दुसर्‍या आणि तिसर्‍या ट्रायलला परवानगी दिली असल्याने, आता कोरोना विरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळणार असल्याची शक्यता आहे. कॉर्बेवॅक्स लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. यापूर्वीच ही लस सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बजारात येईल अंदाज वर्तवण्यात आला होता. तर भारत बायोटेकच्या ते 18 वर्ष वयोगटातील कोवॅक्सिनच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांचा अभ्यास सुरु आहे. डीसीजीआयने जुलैमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला 2 ते 17 वर्षे वयोगटासाठी दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या करण्यास परवानगी दिली.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply