कर्जत : बातमीदार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी (दि. 14) रमजान ईद मशिदीत न जाता आपल्या घरीच साजरी केली.
रमजान ईदच्या दिवशी सकाळी मशिदीत जावून सामुदायिक नमाज पठण करण्याची मुस्लिम धर्मिंयांची परंपरा आहे. त्यानंतर मोठ्या उत्साहात एकमेकांना शुभेच्छा देत ईद साजरी करून रोजाची सांगता करीत असतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने शुक्रवारी रमजान ईद साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरना संसर्ग टाळण्यासाठी कर्जत तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी नमाज पठण, इफ्तारसाठी मशिदीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी न जाता सर्व धार्मिक कार्यक्रम आपल्या घरातच साजरे केले. तालुक्यातील कर्जत शहर, दामत, ममदापुर, कळंब, साळोख, चिकनपाडा, सावेळे, पोटल, शेलू, मोहाचीवाडी येथे शिस्त पाळून मुस्लिम बांधवांनी यंदाची रमजान ईद साधेपणात साजरी केली.