Breaking News

पाली प्राथमिक आरोग्य केंद्रास संपूर्ण किटसह ऑक्सिजन सिलेंडर भेट

कोरोना संकटात बल्लाळेश्वर देवस्थानचा मदतीचा हात

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात सामाजिक बांधिलकी जपत  येथील बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे पाली प्राथमिक आरोग्य केंद्राला संपूर्ण किटसह तीन ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्यात आले आहेत.

कोरोना संकटात बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा निधी, गोरगरिबांसाठी चार महिने मोफत सकाळ-संध्याकाळ जेवण, सुधागड तालुक्यातील विविध वाड्या-वस्त्यांवर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, भक्तनिवास क्वारंटाइनसाठी प्रशासनाकडे विनामूल्य वापरण्यास देणे आदी स्वरूपात मदत करण्यात आली. तसेच भक्त निवास क्रमांक 2 फ्रन्टलाइन वर्करसाठी विनामूल्य वापरण्यास देण्यात आला.

पालीतील संघर्ष ग्रुपतर्फे करण्यात आलेल्या मागणीच्या अनुषंगाने बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टने नुकताच पाली प्राथमिक आरोग्य केंद्राला संपूर्ण किटसह तीन ऑक्सिजन सिलेंडर भेट दिले.

या वेळी बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. धंनजय धारप, तहसीलदार दिलीप रायण्णावार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी, पोलीस निरीक्षक विजय तायडे, डॉ. नंदकुमार मूळे, बल्लाळेश्वर देवस्थानचे उपेंद्र कानडे, विनय मराठे, राहुल मराठे व शेखर सोमण, समाजसेवक भास्कर दुर्गे, कपिल पाटील, अमित निंबाळकर, नरेश शिंदे, स्वप्नील खंडागळे, अजय मुळे, महेंद्र निकुंभ, योगेश सुरावकर व संतोष भगत आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply