Breaking News

वावळोली कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून ’एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत वावळोली कोविड केअर सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व औषधे भेट देण्यात आली.

तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी स्वेच्छेने निधी गोळा केला आणि त्यातून वावळोली कोविड केअर सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व औषधांची भेट दिली. तहसीलदार दिलीप रायण्णावार, गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष कमलाकर शिंदे, तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समिती अध्यक्ष मोरेश्वर कांबळे यांच्या हस्ते तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी, डॉ. नंदकुमार मुळे यांच्याकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली.

सुधागड तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अनिल राणे, कैलास म्हात्रे, प्रशांत गुरव, सुनील फाळे, नवनीत म्हात्रे, सुभाष चव्हाण, सतीश हुले, दिपक दंत, बालाजी राठोड आदी या वेळी उपस्थित होते.

कोरोना संकटात मदतीसाठी सर्व शिक्षक संघटना व शिक्षक धावून आले आहेत. सर्वांनी सामाजिक बांधिलकी जोपासत कोविड सेंटरला वैद्यकिय साहित्य भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

-अनिल राणे, सचिव, प्रा. शिक्षक समन्वय समिती, सुधागड

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply