अलिबाग ः प्रतिनिधी
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष निधी चौधरी यांनी रविवारी (दि. 16) रात्री उशिरा जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकार्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा समन्वय अधिकारी
सर्जेराव मस्के-पाटील, तहसीलदार सतिश कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, राज्य माहिती व तंत्रज्ञान विभागाचे शार्दुल भोईर हे प्रत्यक्ष, तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषदा-नगरपंचायत मुख्याधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
या संवादादरम्यान जिल्हाधिकारी चौधरी यांनी चक्रीवादळाच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने सुरक्षिततेबाबत केलेल्या तयारीचा आढावा घेतला. विशेषतः समुद्रकिनार्यालगतच्या कच्च्या घरातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरणाची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याविषयी त्याचप्रमाणे जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती करणारे जे प्लांट्स आहेत तेथून रुग्णालयाला पोहचविला जाणारा ऑक्सिजन हा विनाअडथळा पोहचविण्यात येण्याची खबरदारी यावी, अशा सूचना जिल्हाधिकार्यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या, तसेच त्यांनी सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व इतर सर्व यंत्रणांच्या अधिकार्यांना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क व सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …