Breaking News

रायगडात 8,383 नागरिकांचे स्थलांतर

अलिबाग ः जिमाका
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील एकूण दोन हजार 299 कुटुंबांतील मिळून एकूण आठ हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
यामध्ये पेण तालुक्यात 62 कुटुंबांतील 193 जण, मुरूड 316 कुटुंबांतील एक हजार 67 जण, पनवेल 168 जण, उरण 122 कुटुंबांतील 451 जण, कर्जत 48 जण, खालापूर 670 जण, माणगाव 291 कुटुंबांतील एक हजार 309 जण, रोहा 100 कुटुंबांतील 523 जण, सुधागड 45 कुटुंबांतील 185 जण, तळा 36 कुटुंबांतील 135 जण, महाड 195 कुटुंबांतील एक हजार 80 जण, पोलादपूर 81 कुटुंबांतील 295 जण, म्हसळा 134 कुटुंबांतील 496 जण आणि श्रीवर्धन  तालुक्यात 761 कुटुंबांतील एक हजार 158 जण यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील एक हजार 104 घरांचे अंशत:, तर एका घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे तीन व्यक्तींचा मृत्यू व काही जखमी झाल्याची नोंद झाली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply