वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, उपसरपंचांसह शेकाप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून होत असलेली विकासकामे व त्यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीमधील शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच, उपसरपंचांसह असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 4) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अन्य उपस्थित मान्यवरांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन भाजपमध्ये स्वागत केले. पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक पवार, उपसरपंच संतोष पाटील, विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर, माजी सरपंच सतीश मालुसरे, गुरू भोईर, सुधीर पवार, माजी उपसरपंच संतोष शेळके, प्रवीण म्हात्रे, प्रवीण पालव, विचुंबे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच किशोर सुरते, माजी सदस्य हरिश्चंद्र भालेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रमोद घरत, अनंता पाटील, राजाराम पाटील, माजी उपसरपंच सुरेश घरत, सुनील दळवी, संभाजी घरत, गोविंद पालकर, नामदेव काठावले, जीवन घरत, रूपेश घरत, दत्तात्रेय शिंदे, ओंमनाथ निगडूसे, अंकुश घरत, सागर घरत, सुभाष घरत, प्रणय दळवी, बाळू पवार, नितीन जळे, नितीन भोयी, मनोहर पाटील, शांताराम पाटील, मुकुंद पाटील, अरुण पाटील, सागर पाटील, रोशन पाटील, दिगंबर पाटील, प्रकाश पाटील, रूपेश पवार, विलास गाताडे, उमेश जळे, बाळू पवार, जगदिश पाटील, ओंकार पाटील, कल्पेश पाटील, महेंद्र भगत, रामदास पाटील, मेघनाथ गडकरी, हरिश्चंद्र पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी स्वागत केले.