कळंबोलीत 38 नागरिकांची ‘आरटी-पीसीआर’
पनवेल : वार्ताहर
पनवेल परिसरात विनाकारण फिरणार्यांसाठी पोलीस आणि पालिकेच्या माध्यमातून अनोखी कारवाई सध्या सुरू करण्यात आली आहे. मोकाट फिरणार्या नागरिकांची कोरोना चाचणी करून पॉझिटिव्ह आल्यास त्यांची रवानगी थेट कोविड सेंटरमध्ये करण्यात येत आहे. या कारवाईमुळे विनाकारण फिरणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
काही लोकांना कोरोनाची लक्षणे असून सुद्धा कोरोना तपासणी न करता लक्षणे दिसताच घरीच उपचार करत आहेत. त्याचप्रमाणे लॉकडाऊनमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कळंबोली वसाहत व परिसरात कमी होत असल्याने नागरिकांच्या मनातील भीती कमी झालेली आहे. त्यामुळे नागरिकांचे विनाकारण इतरत्र वावरणे सुरू झालेले आहे. कळंबोली पोलीस व पनवेल महानगर पालिका वैद्यकीय विभाग नियमित नागरिकांना सुचना देवून बाहेर न पडण्याचे नागरिकांना आवाहन करत असताना सुद्धा मॉर्निग वॉक इविनिंग वॉक करणारे विनाकारण घराबाहेर फिरत आहेत अशा 38 नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. मास्क न घालणे, विनाकारण फिरणारे नागरिकांवर दंडात्मक कारवाई सोबत टेस्ट करण्यात येणार आहे. व टेस्ट मध्ये कोविड पॉझिटिव्ह आढळल्यास थेट इंडिया बुल्स येथे रवानगी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे.
कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता असल्याने पनवेल परी-2चे पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील व पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रे क्रं-4, नवीन पनवेलच्या वैद्यकीय अधिकारी अनिल पाटील यांच्याशी समन्वय साधून कळंबोली पोलीस ठाणे हद्दीत संयुक्त कारवाईमध्ये शिवसेना शाखा नाक्यावरून प्रवेश करणारे ठिकाणी नाकाबंदी करून विनाकारण फिरणार्या 37 लोकांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आलेली आहे. कारवाईमध्ये वैद्यकीय पथकाचे पाच कर्मचारी व पोलीस दलाचे तीन अधिकारी व आठ कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता.
आरटीपीसीआर तपासणी केल्याने मोकाट बाहेर फिरणार्यांवर नियंत्रण येणार आहे. ही कारवाई यापुढेही केली जाईल. मास्क न घालणे, विनाकारण फिरणारे नागरिकांवर दंडात्मक कारवाई सोबत टेस्ट करण्यात येणार आहे. टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्या त्यांची रवानगी ताबडतोब इंडिया बुल येथे करण्यात येईल. त्यामुळे विनाकरण बाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे.
-संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळंबोली