पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी हे प्रत्येक बूथवर जाऊन 1 अधिक 25 असे कार्यकर्ते व नागरिक यांची भेट घेऊन आपल्या विभागामध्ये 2019पासून आजपर्यंत आमदारकीच्या कार्यकाळात कोणकोणती विकासकामे झाली याचा आढावा घेत आहेत. या बूथ अभियानाला शनिवारी (दि. 10) पळस्पे जिल्हा परिषद विभागातून प्रारंभ झाला.
आमदार महेश बालदी यांनी पळस्पे जि.प. गटातील कोळखे, पारपुंड, पेठ, डेरवली येथे जाऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्यासह सुनील गवंडी, रवी शेळके, सुरेश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.
आमच्या विभागात याआधी विकासकामे झाली नव्हती एवढी या पाच वर्षांत झाली. शिवाय आमदार महेश बालदी स्वतः या विकासकामांचा आढावा घेतात. यामुळे आम्ही सोसायटीमधील रहिवासी समाधानी आहोत, असे डेरवली कॉलनीतील नागरिकांनी बूथ भेट अभियानादरम्यान सांगितले.
या वेळी आमदार महेश बालदी यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत किती महिलांनी अर्ज भरले आणि किती जण पात्र झाल्या याचाही आढावा घेतला. ज्या महिलांचे अर्ज भरायचे राहिले असतील त्यांनी आमच्या कार्यालयामार्फत लवकरात लवकर या योजनेचे अर्ज भरून घ्यावेत, असे आवाहनही आमदारमहोदयांनी उपस्थित महिलांना केले.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …