Breaking News

खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण

खारघर ः रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष खारघरच्या माध्यमातून ट्रॅफिक सिग्नल लोकार्पण सोहळ्याचे आयोजन सेक्टर 15 येथील घरकुल स्पेगिटी चौक येथे रविवारी (दि. 17) करण्यात आले. भाजपचे मावळ लोकसभा मतदरसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूरयांच्या हस्ते या सिग्नलचे लोकार्पण झाले.
या वेळी भाजपचे खारघर शहरचे अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर, नरेश ठाकूर, भाजप नेते किरण पाटील, समीर कदम, अमर उपाध्याय, मोहन भुजबळकर, दर्शन सिंग, ए. के. बुरांबे, रामचंद्र पाटील, संतोष गायकर, आरपीआयचे खारघर शहराध्यक्ष संतोष सोनकांबळे, खारघर मंडळ सोशल मीडिया सेलच्या सहसंयोजिका कांचन बिर्ला, महानगरपालिकाचे पथविक्रेता समितीचे सदस्य प्रतीक्षा माळी, आशा मोरे, छाया हरेल, शकुंतला नेगी, निर्मला उभारे, दिपाली गायकवाड यांच्यसह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीला एमआयडीसीकडून जागेचे हस्तांतरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीच्या पुनर्वसनासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न …

Leave a Reply