Breaking News

ओएनजीसी येथील लसीकरण केंद्र पुन्हा सुरू करा : परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 20मधील ओएनजीसी येथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र पुन्हा लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ओएनजीसी येथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात नगरसेवक अजय बहिरा यांनी सभागृह नेते परेश ठाकूर, तसेच आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त देशमुख यांच्याकडे यासंबंधी कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.  
या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20मधील ओेएनजीसी येथील लसीकरण केंद्र काही कारणास्तव बंद करण्यात आल्यामुळे परिसरातील रहिवाश्यांना लसीकरणाकरिता मोठ्या प्रमाणात
नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ओएनजीसी परिसरातील नागरिकांना लसीकरणासाठी दुसर्‍या ठिकाणी जाण्याकरिता वाहनांची व्यवस्था तसेच पावसामुळेदेखील ये-जा करण्यास त्रास सहन करावा लागत आहे. या विषयाचे महत्त्व लक्षात घेता प्रभाग क्रमांक 20मधील ओएनजीसी येथील लसीकरण केंद्र पुन्हा लवकरात लवकर सुरू करण्यात यावे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply