Breaking News

मोर्बेच्या उपसरपंच प्रभावती नावडेकर स्वगृही भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील मोर्बे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रभावती परशुराम नावडेकर यांनी बुधवारी (दि. 19) शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पक्षात स्वगृही प्रवेश केला. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नावडेकर यांचे पक्षात स्वागत केले.
मोर्बे येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, भाजप नेते एकनाथ देशेकर, कोषाध्यक्ष शिवाजी दुर्गे, नामदेव जमदाडे, बाळाराम उसाटकर, माजी सरपंच नारायण भगत, ग्रामपंचायत सदस्य रमेश नावडेकर, एकनाथ नाईक, वाकडीचे माजी सरपंच नरेश पाटील, उपसरपंच मंगेश पाटील, माजी उपसरपंच अरुण पाटील, तळोजाचे माजी सरपंच
संतोष पाटील, तसेच जयवंत खोपकर, नारायण भगत, हरिशेठ नावडेकर, आत्माराम नावडेकर, धनाजी म्हात्रे, दिनेश फडके, भगवान म्हात्रे, जनार्दन भगत, संजय पाटील, रामदास म्हात्रे, प्रमोद भगत, रामदास फडके, रवींद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी मोर्बे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रभावती नावडेकर, परशुराम नावडेकर, भास्कर नावडेकर, बजरंग नावडेकर, अजय नावडेकर, यशवंत नावडेकर आदींनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी पक्षात स्वागत केले.
तत्पूर्वी, मोर्बेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने या वेळी ग्रामस्थांकडून त्यांचे वाजतगाजत जंगी स्वागत करण्यात आले.

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply