गडचिरोली ः प्रतिनिधी
गडचिरोलीत एटापल्लीमधील पेदी-कोटमी येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी 13 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिटकडून ही कारवाई करण्यात आली.
सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. या हंगामात नक्षली तेंदू कंत्राटदारांकडून मोठी खंडणी वसूल करतात. त्याचे नियोजन करण्यासाठी नक्षलवाद्यांची बैठक सुरू होती. त्या वेळी कारवाई करण्यात आली.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार जंगलात नक्षलविरोधी अभियान अंतर्गत पोलिसांची तुकडी नक्षलवादी असलेल्या ठिकाणी पोहचली. पोलीस दिसताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. या चकमकीत 13 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. एकूण किती नक्षलवादी ठार झाले आहेत याची नेमकी माहिती अभियान संपल्यावर सांगता येईल.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper