Sunday , September 24 2023

स्त्रीशक्तीमुळे समाजाची प्रगती -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधी
आजच्या काळात स्त्री ही सर्वच क्षेत्रांत पुढे गेली असून या स्त्रीशक्तीमुळे समाज पुढे गेला असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल येथे केले. ते स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिरात मार्गदर्शन करीत होते.
शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत महिला बालकल्याण विकास विभागामार्फत पनवेल येथील डॉ. आंबेडकर भवन सभागृहामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिराचे आयोजन मंगळवारी (दि. 30) करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन व योजनांच्या घडी पुस्तिकेचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या उपक्रमास गटविकास अधिकारी संजय भोये, नगरसेवक बबन मुकादम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नखाते, गटशिक्षणाधिकारी सीताराम मोहिते, बालविकास प्रकल्प अधिकारी चेतन गायकवाड, भूमी अभिलेख अधीक्षक जगताप, महानवर, रविकांत पाटील उपस्थित होते.
या शिबिरात अंगणवाडीसेविकांना पूर्व प्राथमिक शिक्षण किट, बेबी केअर किट देण्यात आले तसेच आदिवासी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअर, उत्पन्नाचे दाखले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिराचे आयोजन करण्यापूर्वी तळागाळातील अंगणवाडीसेविकांनी गावागावातून समस्या फॉर्म भरून शासनाचे लक्ष वेधण्याची प्रमुख भूमिका बजावली. यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी या उपक्रमात ज्या सेविका उत्कृष्ट कामगिरी बजावतील व जास्तीत जास्त महिलांच्या समस्यांचे समाधान करून देतील अशा 10 सेविकांना प्रोत्साहनपर रोख बक्षीस देण्याची योजना या वेळी जाहीर केली.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply