Breaking News

‘चौकीदार चोर है’ वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींचा माफीनामा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

राफेल प्रकरणात फेरविचार याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या वातावरणात मी आवेशात विधान केले होते आणि विरोधकांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राफेल विमाने खरेदीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेसोबत संरक्षण मंत्रालयातून फुटलेली गोपनीय कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे फेरविचार याचिका फेटाळण्याची केंद्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून ही कागदपत्रे ग्राह्य धरली आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांनी या प्रकरणी ‘चौकीदार चोर है’, अशी प्रतिक्रिया दिली होती, मात्र आपल्या निर्णयात ‘चौकीदार चोर है’ असे कुठेही म्हटलेले नसल्याचे नमूद करत न्यायालयाने अवमान याचिकेवर राहुल यांना नोटीस बजावली. या प्रकरणी भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. या नोटीशीवर राहुल गांधी यांनी सोमवारी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली.

मी निवडणुकीच्या वातावरणात आवेशात विधान केले होते आणि माझ्या राजकीय विरोधकांनी त्या विधानाचा विपर्यास करत गैरसमज पसरवले, असा घूमजाव त्यांनी केला. राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टाने चौकीदार चोर है, असे विधान केल्याचे विरोधकांनी पसरवले होते. मी असा विचार कधी केलाही नव्हता, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना मी 10 एप्रिल रोजी राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल वाचला नव्हता. कोर्टाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा माझा हेतू नव्हता, असेही त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply