गव्हाण : रामप्रहर वृत्त
गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेज इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांना मोबाईल जागरूकतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक ज्युनिअर कॉलेज विभागाचे आर. ए. खेडकर यांनी केले. महात्मा फुले महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख श्री. परीट सर यांनी मोबाईलविषयी जागृती, मोबाईलचा वापर कसा करावा, त्याचे फायदे, तसेच त्याचे दुष्परिणाम आजच्या काळात त्या विषयीची जागरूकता इत्यादीविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्राचार्य श्री. गायकवाड सर यांनीदेखील विद्यार्थ्यांना मोबाईलविषयी मार्गदर्शनात लोभ हा मानवाचा शत्रू आहे. मोबाईल हा चारित्र्याचे संवर्धन करत नाही. चारित्र्य नष्ट झाले, तर जीवन बरबाद होते, असे मार्गदर्शन केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर श्री. घाग सर, रयत बँकेचे संचालक व लाईफ वर्कर श्री. कोळी सर, तसेच ज्युनिअर कॉलेजचे विभागप्रमुख बी. पी. पाटोळे, यू. डी. पाटील, एम. के. घरत, ए. आर. पाटील व सर्व रयतसेवक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार एस. आर. कदम यांनी मानले.