सोयीसुविधांचा घेतला आढावा
पनवेल ः प्रतिनिधी
येथील महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांची महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी शनिवारी (दि. 22) पाहणी केली आणि सोयीसुविधांचा आढावा घेतला.
या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेवक समीर ठाकूर, अमर पाटील, बबन मुकादम, एकनाथ गायकवाड, मनोज भुजबळ, नगरसेविका सीता पाटील, प्रमिला पाटील, विद्या गायकवाड, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, डॉ. मनीषा चांडक उपस्थित होत्या.
सध्या महापालिका क्षेत्रात 15 शासकीय लसीकरण केंद्र सुरू आहेत. या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या दुसर्या डोसचे लसीकरण सुरू आहे. यातील कळंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 4, आरोग्य उपकेंद्र काळभैरव मंगल कार्यालय कळंबोली, रोटरी क्लब सेंटर खांदा कॉलनी, रोटरी कम्युनिटी सेंटर नवीन पनवेल या लसीकरण केंद्राना महापौरांनी भेटी देऊन तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला तसेच तेथील डॉक्टरांशी चर्चा करून लसीकरणाबाबत माहिती घेतली.