पी 305 तराफ्यावरील बेपत्ता कर्मचारी असण्याची शक्यता
अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यामधील नागाव, आवास, दिघोडी आणि मुरूड या समुद्रकिनार्यांवर शनिवारी (दि. 22) सकाळी पाच मृतदेह आढळले. हे मृतदेह अरबी समुद्रात बुडालेल्या पी 305 या तराफ्यावरील बेपत्ता कर्मचार्यांचे असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
अलिबाग तालुक्यातील नागाव येथे दोन, आवास व दिघोडी येथे प्रत्येकी एक आणि मुरूड समुद्रकिनार्यावर एक असे पाच मृतदेह वाहून आले. या मृतदेहांची ओळख पटलेली नाही.
तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रामध्ये बुडालेल्या पी 305 या तराफ्यावरील काही कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. रायगडात आढळलेले मृतदेह या बेपत्ता कर्मचार्यांपैकीच असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने पाच मृतदेह आढळल्याची महिती संबंधित यंत्रणेला दिली आहे.