Breaking News

पनवेल तालुक्यात 134 नवीन रुग्ण

चौघांचा मृत्यू; 289 जणांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 24) कोरोनाचे 134  नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 289 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 104 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे तर 264 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 30 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 25 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल सेक्टर 14 मधील  ई-1 बिल्डिंग 20 बी, सेक्टर 15  ए , भुजबळ वाडी, पंचशील नगर आणि  खारघर सेक्टर 15 घरकुल सोसायटी मधील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत नऊ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1843 झाली आहे. कामोठेमध्ये 16 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2250 झाली आहे. खारघरमध्ये 48 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 2107 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये नऊ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1945 झाली आहे. पनवेलमध्ये 21 नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या 1811 झाली आहे. तळोजामध्ये चार नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 586 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 10538 रुग्ण झाले असून 9107  रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.42 टक्के आहे. 1173 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 258 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन 30 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये करंजाडे सात, मालेवाडी-सुकापुर सहा, उलवे चार, विचुंबे, सुकापूर, शिरढोण येथे प्रत्येकी दोन तर वहाळ, कोप्रोली, कोळेवाडी, चिंध्रण, भरतपाडा-चिपळे, भंगारपाडा- कुंडेवहाळ आणि बेलवली येथे प्रत्येकी एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. तर 25 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्हची संख्या 3145  झाली असून 2651 जणांनी कोरोनावर मात केली असून 61 जणांचा मृत्यू झाला आहे.

उरण तालुक्यात दोघांना लागण

उरण : उरण तालुक्यात सोमवारी कोरोना पॉझिटीव्ह दोन रुग्ण आढळले व 15 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये वारीक आळी नागाव उरण, भेंडखळ येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये जेएनपीटी टाऊनशिप दोन, मुळेखंड, स्मशान भूमी जवळ पाले, दिघोडे, पोलीस स्टेशन, जेएनपीटी, बोरी, जासई जिजामाता हॉस्पिटल जवळ, आयुश क्लिनिक जवळ भेंडखळ, रांजणपाडा चिरनेर, नारळबाग पागोटे, करंजा नवापाडा, उरण, भेंडखळ येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या  1254  झाली आहे. त्यातील 1035  बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 162 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 57 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी महिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.       

रोहा तालुक्यात 24 नवे बाधित

रोहा : रोहा तालुक्यात सोमवारी 24 कोरोना बाधित व्यक्ती  शहरासह ग्रामीण भागात आढळले आहेत. त्यामुळे रोहा तालुक्याची कोरोना रुग्णांची संख्या 1108 एवढी झाली आहे. 11 व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून कोरोनावर मात करणार्‍यांची संख्या 854 एवढी झाली आहे. तर एका व्यक्तीला प्राण गमवावे लागले आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरात सात तर ग्रामीण भागामध्ये 17 असून यामध्ये 14 पुरुषांचा तर 10 महिलांचा समावेश आहे. 60 वर्षावरील तीन व्यक्ती असून 15 वर्षाखालील दोन मुलांचा समावेश आहे. रोहा तालुक्यात आत्तापर्यंत 30 व्यक्तींना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. रोहा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागांमध्ये आता 224 सक्रिय कोरोना बाधित व्यक्ती विविध ठिकाणी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

महाड तालुक्यात चार नवे पॉझिटिव्ह

महाड : महाड तालुक्यात सोमवारी कोरोनाचे चार नवे रुग्ण आढळून आले आहेत तर पाच जणांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये वाकी 47 वर्षीय पुरुष, दासगाव 26 व 30 वर्षीय पुरुष, लक्ष्मी कॉलनी 52 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. महाडमध्ये 165 रुग्ण उपचार घेत असून, 661 रुग्ण बरे झाले आहेत तर अजूनपर्यंत 866 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

कर्जत तालुक्यात तिघांना संसर्ग

कर्जत : कर्जतमध्ये सोमवारी तीन नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत कर्जत तालुक्यात आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 755 वर गेली असून 634 रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. तर मृतांची संख्या 39 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील आमराई विभागात दोन, नेरळमधील राम मंदिर नजीकच्या इमारत येथे एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply