Breaking News

बॅडमिंटनमध्ये तीन गेमची गुणपद्धती कायम

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

बॅडमिंटन खेळाची गुणपद्धती सर्वोत्तम पाच गेमऐवजी तीन गेमपुरतीच मर्यादित राहील, असा निर्णय जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमताने घेण्यात आला. ऑनलाइन झालेल्या मतदानामध्ये 282 जणांनी मते नोंदवली. 66.31 टक्के जणांनी या पद्धतीला पाठिंबा दर्शवला, मात्र 33.69 जणांनी विरोध केल्यामुळे नियमानुसार एकूण मतांपैकी दोन-तृतीयांश तीन मते मिळवण्यात पाच गेमची गुणपद्धती अपयशी ठरली. बॅडमिंटनमध्ये सध्या 21 गुणांचे सर्वोत्तम तीन गेम यानुसार सर्व सामने रंगतात. यापूर्वी 2014मध्ये 11 गुणांच्या सर्वोत्तम पाच गेमचा प्रयोग करण्यात आलेला. इंडोनेशिया, मालदीव, कोरिया, चायनीज तैपई येथील बॅडमिंटन संघटनांचा पाच गेमच्या पद्धतीला पाठिंबा होता. एकूण मतांपैकी दोन-तृतियांश मते मिळवण्यात पाच गेमच्या गुणपद्धतीला अपयश आले. त्यामुळे बॅडमिंटनचे सामने पूर्वीच्या गुणपद्धतीनुसारच खेळविण्यात येतील. जगभरातील बॅडमिंटन संघटनांनी या मतप्रक्रियेत सहभाग नोंदवल्यामुळे मी आनंदी आहे, असे जागतिक बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष पॉल एरिक होयर यांनी सांगितले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply