Breaking News

आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात

श्रद्धा फाऊंडेशनचा उपक्रम; जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कडाव ः वार्ताहर

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील मनोरुग्णांची मनोभावे सेवा करून त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार करण्याचे काम डॉ. भरत वाटवाणी यांचे श्रद्धा फाऊंडेशन करीत आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जतमधील वेणगाव आदिवासी वाडीमध्ये डॉ. भरत वाटवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा भाजपचे जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, कर्जत शहर सरचिटणीस प्रकाश पालकर, वेणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अभिषेक गायकर यांच्या उपस्थितीत आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कर्जतमधील वेणगाव ग्रामपंचायत हद्दीतील मोठे वेणगाव येथील आदिवासी वाडीमधील 80 आदिवासी कुटुंबांना श्रद्धा फाऊंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्या मनीषा घाडगे, वैभव सावंत, मनोहर घाडगे आदी उपस्थित होते.

देशातील सर्व समाज जातीधर्म विसरून ज्या पद्धतीने कोरोनाशी लढत आहे हे पाहता भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही खूप गौरवास्पद बाब आहे. या लढ्यात आपल्याला निश्चितच यश मिळेल. आपल्या आजूबाजूला आपला कोणी बांधव उपासमारीची शिकार होणार नाही याची दक्षता घेऊन त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.

 -रमेश मुंढे, चिटणीस, रायगड जिल्हा भाजप

राज्यातील गोरगरीब, गरजू आणि मोलमजुरी करणार्‍या बांधवांसाठी केंद्र व राज्य सरकारने सर्व सुविधा उपलब्ध केल्यानंतरही आज अनेक सामाजिक संघटना, राजकीय व्यक्ती आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला हे कौतुकास्पद आहे. श्रद्धा फाऊंडेशनसारख्या मनोरुग्णांच्या सेवेसाठी दिवसरात्र मेहनत घेणार्‍या सामाजिक संस्थेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांना मोलाची मदत केली आहे.

 -प्रकाश पालकर, सरचिटणीस, कर्जत शहर, भाजप

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply