Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी गरजू नागरिकांना धान्यवाटप; खारघरमध्ये नगरसेविका नेत्रा पाटील यांच्यातर्फे उपक्रम

कळंबोली : बातमीदार

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त खारघरमधील प्रभाग 4च्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने गरीब व गरजूंना मोफत धान्य वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे व्यवसाय, नोकरी, कामधंदे, रोजगार बंद असल्यामुळे बिकट परिस्थिती ओढवली आहे. अशांना एक मदतीचा हात म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस हा समाज उपयोगी, लोकहितवादी कार्यक्रम राबवत साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने नेत्रा पाटील यांनी गरीबांना अन्नधान्य वाटप केले. सध्यस्थितीत अनेक दुकाने अथवा व्यवसाय बंद आहेत. याची जाणीव ठेवत खारघरमधील लाँड्री व्यावसायिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न लक्षात घेत खारघर शहरातील सर्वच लाँड्री व्यवसायिकांनादेखील अन्नधान्याचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी भाजप खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक रामजी बेरा, उपाध्यक्ष दिलीप जाधव, सरचिटणीस दीपक शिंदे, उद्योग आघाडीचे संयोजक राजेंद्र उर्फ मामा मांजरेकर, भरत कोंढाळकर, खारघर लाँड्री असोसिएशनचे संस्थापक हनुमंत पवार, भाजपचे संदीप एकबोटे, शेखरसिंग चौव्हान, स्मिता आचार्य, अल्पना डे, मेघनाथ ठाकूर, पंढरीनाथ ठाकूर, विजय ठाकूर, संदीप कासार यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply