महाड : प्रतिनिधी
प्राईड इंडिया या संस्थे तर्फे महाड तालुक्यातील पारवाडीवाडी व करजखोल आदिवासीवाडी येथे जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले. या वेळी स्वच्छता व लसीकरणाबाबत जनजागृती करून स्वच्छता कीटही देण्यात आले. त्यामध्ये साबण, टूथ ब्रश आणि टूथ पेस्ट, मास्क तसेच खोबरेल तेल इत्यादीचा समावेश आहे.
संस्थेचे व्यवस्थापक डॉ. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून गावामध्ये कोरोना संदर्भात जनजागृतीचे बॅनर लावण्यात आले तसेच हात कसे धुवावेत, या संदर्भात प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. आदिवासी बांधवांना कोरोना संदर्भात काळजी घेण्याविषयी सांगून लसीकरण किती महत्त्वाचे आहे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
संस्था संघटक प्रभाकर सावंत, रुपेश धामणस्कर व गोरुले यांनी पारवाडी व करजखोल आदिवासीवाडी येथे मोलाचे सहकार्य केले.