Breaking News

खालापुरातील शिवभोजन केंद्र चालकांची थाळी रिकामी

 पाच महिन्यांपासून मोबदला नाही

खोपोली : प्रतिनिधी

कोरोना काळात गरिबांच्या पोटाला आधार देणारी शिवभोजन थाळीचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र शिवभोजन केंद्र चालकांची अवस्था बिकट झाली आहे. खालापूर तालुक्यातील केंद्र चालकांना गेल्या चार ते पाच महिन्यापासून शासनाकडून मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे केंद्र कसे चालू ठेवावे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

दहा रुपयात पोटभर जेवण असे या शिवभोजन थाळीचे स्वरूप आहे. चपाती, भात, भाजी आणि डाळ असे पूर्ण जेवण शिवभोजन थाळी मिळते. लॉकडाऊन काळात ही थाळी पाच रुपयात आणि नंतर पूर्णपणे मोफत देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. हाताला काम नसलेले अनेक कुटुंब थाळी मिळावी, यासाठी रांगेत उभे असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

शिवभोजन थाळी केंद्र चालकांनी राज्य शासनाकडून अनुदान दिले जाते. मात्र गेल्या चार ते पाच महिन्यांपासून खालापूर तालुक्यातील अनेक शिवभोजन केंद्र चालकांना त्यांनी जमा केलेल्या बिलांचा मोबदला शासनाकडून मिळालेला नाही. सुरुवातीला नियमित वेळेवर मिळणारा मोबदला आता मिळत नसल्याने शिवभोजन केंद्र कसे चालवावे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. शिवभोजन थाळी सुरू राहण्यासाठी केंद्र चालकांना वेळेवर मोबदला देणे आवश्यक आहे.

अनेकदा केंद्र चालकांकडून आलेल्या बिलांमध्ये चुका असतात, त्यांची सर्व तपासण्या कराव्या लागतात, अनेकदा बिलेही उशिरा जमा होतात, त्यामुळेही त्यांची बिले उशिरा पास होतात.

-श्री. बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply