Breaking News

मराठा समाजाचा 8 डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा; राज्यस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणासाठी 8 डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या रविवारी (दि. 29) झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबईत हिवाळी अधिवेशन होत असून, त्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थी तरुणांची भरती न झाल्याच्या निषेधार्थ 1 व 2 डिसेंबर रोजी राज्यातील महावितरण अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत. त्यानंतर 8 डिसेंबरला प्रत्येक जण वाहनातून विधान भवन येथे पोहचून धडक दिली जाणार आहे, पण एखाद्या वेळेस अधिवेशन पुढे घेतल्यास पुढील दिशादेखील लवकरच ठरविली जाईल, असे कोंढरे यांनी सांगितले. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यामुळे विद्यार्थीवर्गाचे खूप नुकसान झाले आहे. त्यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करीत असल्याचेही कोंढरे यांनी नमूद केले. सर्व प्रमुख नेतेमंडळीनी एकत्रित बसून चर्चा केल्यास आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो, अशी भूमिकाही या वेळी कोंढरे यांनी मांडली.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply