Breaking News

पत्नीची हत्या, पतीला अटक

साळाव संजयनगर आदिवासीवाडीतील घटना

रेवदंडा : प्रतिनिधी

किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारल्याची घटना साळाव संजयनगर आदिवासीवाडीत घडली. या प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

संजय सुंदर वाघमारे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो साळाव (ता. मुरूड) येथील बिर्ला मंदिराच्या बाजूला असलेल्या संजयनगर आदिवासीवाडीत  पत्नी रत्ना संजय वाघमारे हिच्यासह रहात होता. त्या दोघांत शुक्रवारी रात्री किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यावेळी राग अनावर होऊन पती संजय याने पत्नी रत्ना हिच्या डोक्यात दगड घातली. त्यात जखमी झालेल्या रत्नाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची खबर लागताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे निरिक्षक अशोक थोरात यांनी लागलीच घटनास्थळी जावून संजय वाघमारे याला अटक केली.

या प्रकरणी संजय वाघमारे याच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Check Also

‘कहो ना… प्यार है’ला पंचवीस वर्ष झालीदेखील!

अगदी कालपरवाची गोष्ट वाटते. मनोरंजन उपग्रह वाहिन्यांवर अवघ्या काही सेकंदाच्या एका तजेलदार नवीन टीझरने आपलं …

Leave a Reply