Breaking News

ट्वेण्टी-20 वर्ल्डकप महाराष्ट्रात?; बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत प्रस्ताव

मुंबई ः प्रतिनिधी

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ट्वेण्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम निर्णय एक महिन्याने घ्यावा, अशी विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) केली जाणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्राचा सर्वोत्तम पर्याय झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. दूरचित्रसंवादाद्वारे 50 मिनिटे चाललेल्या विशेष सर्वसाधारण सभेत आयपीएल आणि ट्वेण्टी-20 विश्वचषक या दोन महत्त्वाच्या विषयांवर बिनविरोध निर्णय घेण्यात आले. सर्वच सदस्यांना विश्वचषक स्पर्धा भारतात व्हावी असे वाटते. या दृष्टीने महाराष्ट्रात मुंबईतील तीन आणि पुण्यात एक अशा चार मैदानांवर स्पर्धा होऊ शकेल, असा प्रस्ताव चर्चेत आला, परंतु ही स्पर्धा महाराष्ट्रात झाल्यास पाकिस्तानबाबतचा निर्णय हा राजनैतिक पातळीवर घ्यावा लागेल. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला 1 जूनला दुबईत होणार्‍या आयसीसी कार्यकारी मंडळाच्या बैठकीला हजर राहणार आहेत. या बैठकीत ट्वेण्टी-20 विश्वचषकाचा निर्णय घेण्यात येईल. आयसीसीने निर्णयासाठी एक महिन्याची (1 जुलैपर्यंत) मुदत द्यावी, असा प्रस्ताव बीसीसीआयकडून मांडण्यात येणार आहे. सद्यस्थितीत देशामधील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमधील स्थितीचा दावा करून अंतिम निर्णय मे महिन्यातच घेणे घाईचे ठरेल, असे बैठकीत मांडण्यात आले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply