Breaking News

कार्तिक म्हणतो, धोनी असेपर्यंत मी तर फर्स्ट एड कीट

मुंबई : प्रतिनिधी

पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणार्‍या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात दिनेश कार्तिकचा समावेश झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला. स्वतः कार्तिकलादेखील यामुळे आश्चर्य वाटले होते. संघातील निवडीबाबत प्रतिक्रिया देताना कार्तिक म्हणाला की, महेंद्रसिंह धोनी मैदानावर आहे, तोवर मी संघाबरोबर असणारे एक छोटेसे फर्स्ट एड किट (प्रथमोपचार पेटी) असेन.

माझी विश्वचषकासाठी संघात निवड झाली आहे. याचा मला खूप आनंद आहे. कोणत्याही कारणामुळे धोनीला एखादा सामना खेळता आला नाही, तर त्याच्या जागी मला संधी मिळेल. त्या एका दिवसासाठी मी संघात बॅन्ड एडची भूमिका निभावेन.

विश्वचषकासाठीच्या संघात अंतिम 15 जणांच्या यादीतले कार्तिकचे नाव अनेकांना आश्चर्यचकित करणारे होते. महेंद्रसिंह धोनीसाठी राखीव यष्टिरक्षक म्हणून गेल्या काही मालिकांमध्ये रिषभ पंतला संधी मिळत होती. त्यामुळे त्याजागी यष्टीरक्षक म्हणून पंतचीच निवड होईल, असे मत अनेकांनी मांडले होते, परंतु ही सर्व मतं चुकीची ठरवत निवड समितीने कार्तिकची निवड केली आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply