
मुंबई ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने गरजू पालक, स्कूल बस कर्मचारी आणि पत्रकारांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते रविवारी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष जगन्नाथ हेगडे, समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर, उदय पवार, आशिष भालेवार आदी उपस्थित होते.