Breaking News

उलवे नोडमध्ये चिल्ड्रन पार्क, गार्डन, मैदानाचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून  आणि सिडको निधीतून उलवे नोड सेक्टर 19, 19 बी, 2, 3, 5 येथे चिल्ड्रन पार्क, गार्डन आणि सर्वसामान्यांसाठी खेळाचे मैदान उभारण्यात येत आहे. या कामांचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 5) करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पं. स. सदस्य तथा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, युवा मोर्चा उलवे नोड अध्यक्ष निलेश खारकर, उत्तम कोळी, मदन पाटील, राकेश गायकवाड, वितेश म्हात्रे, योगिता अश्विन नाईक, गीता नंदकुमार ठाकूर, पूजा गोपी भोईर, योगिता भगत, प्रिया अडसुळे, प्रीती चंडेल, दीपक गोंधळी, अलंकार म्हात्रे, अभिमन्यू दापोलकर, प्रवीण ठाकूर, अमित नाईक, शंभो पाटील, बाबूराव पाटील, एल. टी. पाटील, हेमंत नाईक, मच्छींद्र कोळी, शैलेश भगत, समाधान पाटील, शफिक शेख, समद शेख आदी उपस्थित होते.

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply