Breaking News

स्नेहल माळीची खारघर ते किल्ले रायगड सायकलिंग

शिवरायांना अनोखी मानवंदना

खारघर ः प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी किल्ले रायगडावर साजरा झाला. याचे औचित्य साधून खारघर येथील राष्ट्रीय सायकलपटू स्नेहल माळी हिने खारघर ते खोपोली असा 100 किमीचा सायकल प्रवास करून महाराजांना अनोखी मानवंदना दिली.
स्नहेल हिने नुकतेच पनवेलमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत कांस्यपदक प्राप्त केले होते. राज्याभिषेकदिनी छत्रपती शिवाजी महाराजांंना मानवंदना द्यावी याकरिता खारघर ते खोपोली असा प्रवास तिने पूर्ण केला. स्नेहल दररोज किमान 50 किमी सायकलिंगचा सराव करीत असते, परंतु राज्याभिषेकाच्या दिवशी तिने 100 किमी सायकलिंग करण्याचा निर्णय घेतला. या वेळी स्नेहलसोबत तिचे प्रशिक्षक राजेंद्र सोनीदेखील उपस्थित होते.
स्नेहलचे वडील शत्रुघ्न माळी हे पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. रविवारी पहाटे 6 वाजता स्नेहलने या प्रवासाला सुरुवात केली. कोरोना काळात सध्याच्या घडीला विविध निर्बंध असल्याने स्नेहलने खोपोली येथे महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देत परतीचा मार्ग पकडला.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply