Breaking News

जोकोव्हिच उपांत्यपूर्व फेरीत

पॅरिस ः वृत्तसंस्था
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व लढतीत दोन सेट गमावूनही सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने सलग 13 गेम जिंकून झोकात पुनरागमन केले. पाचव्या सेटमध्येही आघाडीवर असताना अखेर प्रतिस्पर्ध्यानेच दुखापतीमुळे माघार घेतल्याने जोकोव्हिचच्या 15व्या फ्रेंच उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.
अग्रमानांकित जोकोव्हिच इटलीच्या 19 वर्षीय लोरेंझो मुसेटीविरुद्ध 6-7 (7-9), 6-7 (2-7), 6-1, 6-0, 4-0 असा आघाडीवर होता, मात्र स्नायूंच्या दुखापतीमुळे मुसेटीला माघार घ्यावी लागल्याने जोकोव्हिचला पुढे चाल देण्यात आली.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply