Breaking News

अवघ्या 28 चेंडूंत ठोकले शतक

अहमद मुसद्दिकची वादळी खेळी

पॅरिस ः वृत्तसंस्था
एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, महेंद्रसिंह धोनी, डेव्हिड वॉर्नर हे क्रिकेटपटू आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात. या क्रिकेटपटूंनी आपल्या दमदार फलंदाजीमुळे अनेक विक्रम रचले आहेत, मात्र या सर्वांना मागे टाकत अहमद मुसद्दिकने नवा कारनामा केला आहे. ईसीएस टी-10 लीग म्हणजे युरोपियन क्रिकेट सीरिजमध्ये मुसद्दिकने चक्क 28 चेंडूंत शतक ठोकत सर्वांना स्तब्ध केले.
कुमेरफेल्डर स्पोर्टव्हरिन आणि टीएचसीसी हॅम्बर्ग यांच्यातील सामन्याच्या पहिल्या डावात त्याने हाव पराक्रम केला. यामध्ये 32 वर्षीय अहमद मुसद्दिकने पहिल्याच चेंडूपासून गोलंदाजांचा खरपूस समाचार घेण्यास सुरुवात केली. त्याने 33 चेंडूंत 115 धावा फटकावत आपल्या संघाला 10 षटकांत 2 बाद 198 अशी धावसंख्या उभारून दिली. मुसद्दीकच्या या अविस्मरणीय खेळीत सात चौकार आणि 13 षटकारांचा समावेश होता. त्याने हॅमबर्गच्या खेळाडूंना मैदानात पळव पळव पळवले.
या खेळीसह तो युरोपियन क्रिकेट मालिकेच्या इतिहासात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला. यापूर्वी इंडियन क्रिकेट क्लबचे सदस्य गोहर मनन यांच्या नावावर हा विक्रम नोंदवण्यात आला होता. त्यांनी क्लुज क्रिकेट क्लबविरुद्ध 29 चेंडूत शतक ठोकले होते.
कुमेरफेल्डर स्पोर्टव्हरिनच्या विशाल पाठलाग करताना टीएचसीसी हॅमबर्गचे फलंदाज ढेपाळले. त्यांचे केवळ दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. निर्धारित 10 षटकांत संघाला 53  धावा करता आल्या.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply