नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस पाकिस्तान सुपर लीग सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
क्वेटा ग्लेडिएटर्स विरुद्ध पेशावर जाल्मी यांच्यात पाकिस्तान सुपर लीगचा 19वा सामना सुरू होता. या सामन्यादरम्यान प्लेसिसची पेशावर जाल्मीचा खेळाडू मोहम्मद हसनैनशी धडक झाली. दोन्ही खेळाडू बाऊंड्री अडवण्याच्या प्रयत्नात असताना एकमेकांना धडकले आणि खाली पडले. हसनैनचा गुडघा प्लेसिसला लागला आणि त्याच्या मानेला दुखापत होऊन तो खाली पडला.
पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार प्लेसिसला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही वेळानंतर तो पुन्हा पॅव्हेलियनमध्ये बसलेला दिसला. त्याचबरोबर त्याच्या मानेला दुखापत झाल्याचेही जाणवत होते.
क्वेटा ग्लॅडिएटर्सने पर्यायी खेळाडू म्हणून सैयम अय्यूबला मैदानात उतरविले. प्लेसिस आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. हा सामना पेशावर जाल्मी संघाने 61 धावांनी जिंकला. पेशावरने आधी बॅटिंग करीत 5 बाद 197 धावा केल्या होत्या, तर क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाने मात्र 136 धावांवरच समाधान मानले.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …